ग्रीसची वैभवशाली प्राचीन नगरी अथेन्स


हजारो वर्षे जेथे मानवी संस्कृती नांदती गाजती असते अश्या गावांना प्राचीन म्हटले जाते. भारतात काशी हि प्राचीन नगरी तशी ग्रीस मध्ये अथेन्स ही प्राचीन नगरी आहे. ग्रीसची राजधानी असलेल्या या शहरात आता आधुनिकता प्रवेशली असली तरी आजही येथे अनेक जुन्या इमारती, वास्तू पाहायला मिळतात इतकेच नव्हे तर येथील प्रत्येक छोट्याश्या गल्लीला काही ना काही इतिहास आहे. अथेन्स केवळ ग्रीसच नाही तर युरोपीय मानवी जीवनाचे प्रतिक आहे आणि येथील प्रत्येक जुन्या वास्तूशी संबंधित हजोरो कथा सांगितल्या जातात. योरोपीय सभ्यतेचे केंद्र म्हणून अथेन्स कडे पहिले जाते.


या शहराने जगाला अनेक विद्वान दिले, लोकशाही दिली आणि नाटक, कलेची देणगी दिली. येथील आज पडझड झालेल्या वास्तू पाश्चिमात्य संस्कृतीच्या पाया आहेत. विशेष म्हणजे या शहरातील नागरिक अतिशय स्वागतशील असून अनोळखी लोकांशीही अतिशय प्रेमाने आपुलकीने वागतात. याला फिलोजीनिया परंपरा म्हटले जाते. येथे येणाऱ्या प्रवाशाचे उत्साहाने स्वागत होते. दोन्ही हात पसरून मनापासून तुम्ही आलात याचा आनंद व्यक्त केला जातो. मैत्री या शहराच्या श्वासात भरून राहिली आहे.

दरवर्षी सरासरी ४५ लाख पर्यटक या शहराला भेट देतात. येथल्या वैभाशाली इतिहासाने आधुनिकतेची पानेही सहज त्याच्या पुस्तकाला जोडून घेतली आहेत. येथील गल्ल्यातील कॅफे गर्दीने तुडुंब भरलेले दिसतील. या शहराला खास हवेचे वरदान मिळाले आहे कारण येथे वर्षातले २५० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचे असतात. एप्रिल ते ऑक्टोबर हे दिवस प्रवासासाठी मस्त मानले जातात. या शहरातील हद्डा बेट आवर्जून पाहावे कारण येथे कार बंदी आहे त्यामुळे पायी फिरावे लागते अथवा सायकल वापरावी. आक्रोपोलीस सारखी महत्वाची इतिहासिक स्थळे योग्य गाईडच्या मार्गदर्शनाखाली पाहणे श्रेयस्कर .

Leave a Comment