ह्या प्रसिद्ध आयटी कंपन्यांच्या सीईओंची झाली होती हकालपट्टी


आजवर अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर्स, म्हणजेच सीईओंची हकालपट्टी, निरनिरळ्या कारणांवरून केली गेली आहे. कॉम्प्युटर चिप्स बनविणाऱ्या इंटेल कंपनीचे सीईओ असणारे ब्रायन क्रझानीच ह्यांचे, त्याच कंपनीमध्ये काम करीत असलेया महिला सहकाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर होते. हे आरोप सिद्ध झाल्यानंतर ब्रायन ह्यांनी, त्यांची हकालपट्टी होण्याआधीच, स्वतःहून आपल्या पदावरून राजीनामा दिला होता. ब्रायन क्रझानिच ह्यांच्याप्रमाणे जगभरातील अनेक नामवंत आयटी कंपन्यांच्या सीईओंची हकालपट्टी तरी झाली, किंवा त्यांनी राजीनामा तरी दिला.

स्टीव जॉब्स ह्यांची हकालपट्टी त्यांनीच स्थापन केलेल्या प्रसिद्ध ‘ अॅपल ‘ कंपनीतून झाली. स्टीव ह्यंनी १९७६ साली ह्या कंपनीची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्षांचे होते. त्यानंतर त्यांनी पेप्सी ह्या कंपनीतून आलेल्या जॉन स्कली ह्यांना आपल्या कंपनीचे सीईओ नेमले. काही वर्षांनी कंपनीचे सर्वाधिकार आपल्याकडे घेण्याच्या इच्छेने जॉन ह्यांनी स्टीव ह्यांना कंपनीवरील आपले सर्व अधिकार सोडण्यास सांगितले. त्यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी देखील जॉनचे म्हणणे उचलून धरल्याने जॉब्स ह्यांना कंपनी सोडावी लागली.

आयगेट कंपनीचे सीईओ असलेले फनीश मूर्ती ह्यांनाही त्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबध असल्यामुळे कंपनी सोडावी लागली होती. ह्या महिलेने मूर्ती ह्यांच्यावर, त्यांनी तिचे लैंगिक शोषण केले असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर नेमल्या गेल्या गेलेल्या चौकशी समितीने मूर्ती ह्यांना दोषी ठरविल्यामुळे मूर्ती ह्यांची कंपनीच्या सीईओ पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. अश्याच प्रकारचे आरोप मूर्ती ह्यांच्यावर ते इन्फोसिस कंपनीमध्ये कामाला असतानाही लावले गेले होते. मूर्ती ह्यांच्याप्रमाणे ‘एच पी’ कंपनीचे सीईओ मार्क हर्ड ह्यांचीही एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून हकालपट्टी करण्यात आलो होती.

Leave a Comment