या टेबलाला लिलावात मिळाली १ कोटी १६ लाख किंमत


अँटिक आणि युनिक वस्तू ज्यांना आवडतात ते त्यांना आवडलेल्या वस्तूसाठी कितीही किंमत मोजायला तयार होतात याचे उदाहरण नुकतेच दिसले आहे. लंडन येथील अँटिक वस्तूंच्या प्रदर्शनात एका टेबलाला चक्क १ कोटी १६ लाख रु. किंमत मिळाली आहे. १८ जून ते ४ जुलै अशी प्रदर्शनही मुदत आहे आणि त्यात अश्या अनेक युनिक वस्तू मांडल्या गेल्या आहेत.

लिलावात विकले गेलेले हे टेबल ४०० वर्षे जुने आहे आणि त्याचे चारी पाय वेगळे करता येतात अशी त्याची बनावट आहे. पांढरया संगमरवराचा पृष्ठभाग असून त्यावर अनेक मौल्यवान रत्नांनी पाने फुलांचे डिझाईन केले गेले आहे.

याच प्रदर्शनात १० वर्षे जुन्या हर्मेस हँडबॅगला १ कोटी रुपयांची किंमत मिळाली असून हि जगातील सर्वात महागडी बॅग बनली आहे. या बॅगेला १८ कॅरेट व्हाईट गोल्ड मध्ये हिरा जडविलेले कुलूप आहे.

Leave a Comment