या नंबरप्लेटच्या किमती ऐकून व्हाल थक्क


जगात आजकाल महागड्या गाड्या घेण्याची क्रेझ आहे तशीच आपल्या गाडीसाठी युनिक नंबरप्लेट घेण्याची क्रेझ वाढत चालली आहे. देशोदेशीचे प्रादेशिक परिवहन विभाग अश्या विशेष नंबरप्लेट देऊन करोडो रुपयांचा महसूल गोळा करत आहेत. नंबरप्लेट असून असून किती महाग असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर हि माहिती तुम्ही जाणून घ्यायला हवी. जगात या नंबरप्लेट महागड्या म्हणून नोंदल्या गेल्या आहेत.

प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सी एफसी चा मालक रमोन याने २००६ साली त्याच्या रोल्स रॉईस कारसाठी तब्बल २ लाख ८५ हजार युरो मोजून व्हीआयपी वन हा नंबर घेतला होता तर ब्रितीश मोबाईल कंपनीचा मालक माईक मेकाम्बे याने ३ लाख ३३ हजार युरो मोजून मर्सिडीज कारसाठी एम १ हा नंबर मिळविला होता. हि कार त्याने त्याच्या सहा वर्षाच्या मुलाला गिफ्ट म्हणून घेतली होती.

ब्रिटनमधील कार स्टायलिंग कंपनी प्रोजेक्टचा मालक अफझलखान याने त्याच्या मर्सिडीज साठी युके मधली सर्वात महागडी नंबरप्लेट मिळविली. हा नंबर होता एफ १ आणि त्यासाठी अफझलखानने ४ लाख ४० हजार ६२५ युरो मोजले होते. शेख तलत खोउरी याने २००७ साली साडेतीन दशलक्ष युरो मोजून त्याच्या गाडीसाठी ५ नंबर घेतला होता. संयुक्त अरब अमिराती मध्ये गफार खाउरी याने त्याच्या रोल्स रॉयस साठी ७ दशलक्ष युरो मोजून १ नंबर मिळविला होता. जगाताली हि सर्वात महागडी नंबर प्लेट मानली जाते.