स्टीअरिंग ऐवजी माउस आणि स्क्रीन असलेली दोन चाकी इलेक्ट्रिक कार


एका अनोख्या इलेक्ट्रिक कारच्या चाचण्या सध्या चीनमध्ये घेतल्या जात आहेत. १९६१ सालच्या मॉडेल फोर्ड गेरोनवर या कारचे डिझाईन बेतले गेले आहे. ही कार दुचाकी आहे आणि इलेक्ट्रिकवर चालते. फ्युचर टू व्हीलर कार असे तिला म्हटले जात आहे. झु लीनग्युआन यांनी तिचे डिझाईन केले आहे. या कारला स्टीअरिंग व्हील आणि अॅक्सिलेटर नाही. कारचा कंट्रोल संगणकाचा माउस आणि २४ इंची स्क्रीनच्या मदतीने सांभाळला जातो.

थोडक्यात ही एकप्रकारची सेल्फ ड्रायविंग कार म्हणता येईल. बीजिंग मधील लीग्न्यून इंटेलीजंट टेक्नोलॉजी कंपनीने ही कार जगातील अधिकाधिक लोक सहज चालवू शकतील अशी डिझाईन केली आहे. तिचा वापर शहरी वाहतुकीसाठी करता येणार आहे. ही स्कूटर पण आहे आणि कार पण आहे. या कारच्या निर्मितीसाठी लीनग्युआन यांनी २०१४ साली स्टार्टअप कंपनी सुरु केली त्यावेळी तेथे ३ कर्मचारी होते. आता या कंपनीची उलाढाल ६० दशलक्ष डॉलरवर गेली आहे. ही कार उत्पादनासाठी तयार आहे आणि २०२० पर्यंत तिची विक्री सुरु होईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment