महिंद्राची नवी ९ सीटर टीयुव्ही ३०० प्लस लाँच


महिंद्राने युटीलिटी वाहन श्रेणीत आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी ९ सीटर एसयुव्ही टीयुव्ही ३०० प्लस बाजारात आणली असून या गाडीची एक्स शो रूम किंमत ९.४७ लाख रु. आहे. कमी किमतीत ८ ते ९ सीट ची सोय हवी असलेल्या ग्राहकांना नजरेसमोर ठेऊन हि गाडी बाजारात आणली गेली आहे. सिल्व्हर, पांढरा, काळा, लाल आणि केशरी रंगात ती उपलब्ध आहे.

ही गाडी पी ४, पी ६ आणि पी ८ अश्या तीन व्हेरीयंट मध्ये आहे. तिला २.२ लिटरचे डीझेल इंजिन ६ स्पीड मॅन्यूअल गिअर बॉक्स सह दिले गेले आहे. सुरक्षेसाठी डूअल एअरबॅग्ज दिल्या गेल्या आहेत तसेच ७ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम नेव्हिगेशन सह दिली गेली आहे. मायक्रो हायब्रीड तंत्रज्ञानचा वापर केला गेला आहे.

Leave a Comment