चीनमध्ये २०२१ ला धावणार सुपरसॉनिक ट्रेन


नवीन तंत्रज्ञानात नेहमीच आघाडी असलेल्या चीनमध्ये ३०० ते ४०० किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन आता जुन्या झाल्या असून त्यांनी ५०० ताशी ५०० किमी वेगाने बुलेट ट्रेन चालविण्याच्या चाचण्या यशस्वी केल्या आहेत. आता या पुढचे पाउल टाकण्यासाठी तयारी सुरु असून ताशी १५०० किमी वेगाने धावणाऱ्या सुपरसॉनिक ट्रेन चीन तयार करत आहे. या ट्रेनच्या चाचण्या २०२१ सालापर्यंत सुरु होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ही नवी ट्रेन हवेत ध्वनीचा जो वेग असतो त्यापेक्षाही या गाडीचा वेग अधिक असणार आहे. ध्वनीचा हवेतील वेग ताशी साधारण ११९२ किमी असतो. त्यापेक्षा अधिक वेगळा सुपरसॉनिक म्हटले जाते. चीन मधील नवी ट्रेन ताशी १५०० किमीने धावणार आहे. त्यासाठी हायस्पीड पटरी टाकण्याचे काम केले जात आहे.

मंगळवारी दक्षिण पश्चिम जीआवतोंग विद्यापीठातील प्राध्य वेई हुआ यनि२०१८ ट्रान्सपोर्ट परिषदेत ही माहिती दिली असून ती ट्विटरवरही शेअर केली गेली आहे. वेई हुआ म्हणाले अश्या ट्रेन व्हॅक्यूम ट्यूब मध्ये चालविल्या जातात त्यासाठी दीड किमीचा व्हॅक्यूम प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. सर्व सरकारी परवानग्या घेतल्यावर २०२१ मध्ये या ट्रेनच्या चाचण्या सुरु होतील.

Leave a Comment