जगातील ९९ वर्षांची सर्वात वयोवृद्ध योग शिक्षिका ताओ


आज केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध योग शिक्षिका म्हणून ताओ पोर्चन लिंच या ९९ वर्षीय महिलेची नोंद केली गेली असून त्या आजही योग शिकवितात. गेली अनेक दशके त्या योग शिक्षिका आहेत आणि हजारो जणांना त्यांनी योगाचे धडे दिले आहेत. त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत.

ताओ चा जन्म १३ ऑगस्ट २०१८ ला भारतात पुद्दुचेरी येथे झाला आहे. त्यांची आई मणिपुरी तर वडील फ्रेंच होते. ताओचे पालनपोषण भारतातच झाले आहे. त्या ७ महिन्याच्या असताना त्यांची आई वारली आणि नंतर त्यांना काका काकूने सांभाळले. समुद्राकाठी काही लोक योग करत असताना त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षी पहिले आणि तेव्हापासून त्यांना आपणही हे करावे अशी इच्छा झाली.

घरातून काकूचा याला विरोध होता कारण त्याच्या मते योग पुरुषांनी करायचा व्यायाम प्रकार आहे. पण काकूचे न ऐकता ताओने योगाचे शिक्षण घेतले आणि पूर्ण पारंगत झाल्यावर दुसऱ्यांना शिकवायला सुरवात केली. मे २०१२ मध्ये त्यांची जगातील ९२ वर्षाची सर्वात वयोवृद्ध योग शिक्षिका म्हणून गिनीज बुक मध्ये नोंद झाली. आजही हे रेकॉर्ड कायम आहे.

गेल्या वर्षी त्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बंगलोर येथे झालेल्या योग कार्यक्रमाला हजर होत्या आणि त्यांनी योगासने केली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.