शाओमी मी ए २ स्मार्टफोनची फीचर्स लिक


चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या नव्या मी ए २ स्मार्टफोनची फीचर्स लिक झाली असून हा फोन लवकरच लाँच केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन मी ६ एक्स चे अँड्राईड वन व्हर्जन आहे. स्वित्झर्लंडच्या इलेक्ट्रोनिक पोर्टलवर हा फोन लिस्ट केला गेला असून डीजीटेक वेबसाईटवर केल्या गेलेल्या लिस्टिंग नुसार त्याच्या ३२ जीबी स्टोरेज व्हर्जनची किंमत १९८००, ६४ जीबी साठी २२५०० तर १२८ जीबी साठी २५२०० अश्या किमती असतील.

हा फोन गोल्ड, ब्लॅक आणि ब्ल्यू रंगात मिळेल. त्याला ५.९९ इंची फुल एचडी डिस्प्ले, रिअरअल व्हर्टीकल १२ एमपीचा डूअल कॅमेरा, फ्रंटला २० एमपीचा कॅमेरा दिला जाईल. क्विकचार्ज सपोर्ट बॅटरी, आणि अँड्राईड वन ओएस अशी त्याची अन्य फिचर असतील.

Leave a Comment