टाटाचे हिमालयन बाटलीबंद पाणी जगभर विकले जाणार


भारतीय बाजारात महाग श्रेणीत विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्यातील एक टाटा ब्रेवरीजचे हिमालयन पाणी आता जगभर विकले जाणार आहे. भारताबरोबर हे पाणी सध्या अमेरिका आणि सिंगापूर येथे विकले जात आहे. लवकरच जगभरातील अन्य देशात ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार असून त्यासाठीची योजना तयार झाली असल्याचे कंपनीच्या वार्षिक अहवालात नमूद केले गेले आहे.

हे पाणी हिमालयातील शिवालिक पर्वत रांगामधून आणले जाते. जगभरात सध्या बाटलीबंद पाणी व्यवसायात चांगली वाढ होत आहे. यामुळे टाटा ग्लोबल ब्रेवरीज ने त्याच्या बाटलीबंद पाणी व्यवसायाचा पोर्टफोलीओ मजबूत करण्यासाठी ओव्हरसीज मार्केट विस्तार करण्याचे धोरण राबविले आहे. भारतात टाटाचे हिमालयन, टाटा वॉटर प्लस आणि टाटा ग्लूको असे तीन ब्रांड उपलब्ध आहेत.

Leave a Comment