२० टक्क्यांनी वाढली देशातील कोट्यधीशांची संख्या


मुंबई- फ्रान्सच्या सल्लागार आणि तंत्रज्ञान कंपनी कॅपजेमिनीच्या अहवालात वर्ष २०१७ मध्ये देशातील कोट्यधीशांच्या संख्येत २०% वाढ झाली असून कोट्यधीशांच्या संपत्तीतही २१% वाढ नोंदवण्यात आली.

निधी वितरणात असमानतेचे आरोप होत असतानाच यातच हा अहवाल समोर आला. त्यानुसार, श्रीमंतांच्या (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजेच एचएनआय) संख्येत २०.४% वाढ झाली आहे. तर त्यांच्या एकूण संपत्तीत २१% वाढ होऊन ती ६८ लाख कोटी रुपये झाली आहे. याबाबत कॅपजेमिनीने म्हटले आहे की, भारताचा विकास एचएनआयची संख्या आणि संपत्ती या दोन्ही बाबतीत अनुक्रमे ११.२% आणि १२% च्या जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

सतत सहाव्या वर्षी श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ झाली असून २०११ नंतर दुसऱ्यांदा जास्त ही वाढ झाली आहे. जागतिक एचएनआयची संपत्ती पहिल्यांदा ४,७६० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली. बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मालमत्ता व्यवस्थापनाचा विचार करता १२ लाख कोटी त्यांना मिळू शकतात. मालमत्ता व्यवस्थापनात आशिया-पॅसिफिकच्या – ८१% श्रीमंतांनी रस दाखवला आहे. आशिया-पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकेमध्ये एचएनआयची संख्या वेगाने वाढत आहे. एकूण जागतिक वृद्धीत ७४.९% वाढ या दोन्ही क्षेत्रांत नोंदवण्यात आली.

Leave a Comment