मतदान घेऊन ठेवले मुलाचे नाव


नागपूरच्या गोंदिया शहरातील कापड व्यापारी मिथुन आणि त्यांची पत्नी मानसी बंग यांनी त्याच्या नवजात मुलाच्या नामाकारानासाठी वेगळीच युक्ती वापरली. त्यांनी मुलाचे नाव ठरविण्यासाठी चक्क मतदानाचा आधार घेतला. मिळालेल्या माहितीनुसार बंग याच्या ५ जूनला जन्मलेल्या बाळासाठी ३ नावे सुचविली गेली होती. मात्र त्यातले नक्की कुठले नाव ठेवायचे यासाठी त्यांनी १५ जून ला नातेवाईक, मित्रमंडळी आणि स्नेही यांच्यासाठी मतदान ठेवले.

या कार्यक्रमाचे बाल नाम चायन आयोगातर्फे मतदान घेतले गेले. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या लोगोशी साधर्म्य दाखविणारा लोगो होता, तसेच बॅनर्स, मतपत्रिकाहि होत्या. मतपत्रिकेत यक्ष, युवान आणि यौविक अशी तीन नावे होती. मतदानाला माजी खासदार नाना पाटोळे, भाजपचे एक आमदार आणि एक माजी आमदार यांना बोलाविले गेले होते. एकूण १९२ जणांनी मते दिली आणि त्यात सर्वाधिक पसंती युवान नावाला (९२ मते) मिळाल्याने तेच नाव ठेवले गेले.

या दाम्पत्याला पहिली मुलगी असून तिचे नाव भूमी आहे. भूमीच्या जन्मानंतर नामकरण करण्याच्यावेळी कुणा नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने कोणताच कार्यक्रम केला गेला नव्हता. ती हौस मुलाच्या नामकरणाच्या वेळी भागविली असे मुलाचे वडील मिथुन यांनी सांगितले.

Leave a Comment