शाओमी भारतात विकणार टीशर्ट, पेन आणि उश्या


स्मार्टफोन रेडमी वाय टू भारतीय बाजारात नुकताच दाखल झाला असून चीनी कंपनी शाओमी भारतीय बाजारात आता नव्या उत्पादनाबरोबर दाखल होत असून या उत्पादनांचा स्मार्टफोनशी दुरान्वयेही संबंध नाही हे विशेष. शाओमी भारतीय बाजारात मी रोलर बॉलपेन, मी ट्रॅव्हल यु शेप उशी, मी आय लव्ह यु टीशर्ट तसेच मी बँड टू आणि मी बँड एचअरएक्स साठी चार्जीग केबल अशी उत्पादने घेऊन आली आहे. ही सर्व उत्पादने वेबसाईट मी डॉट कॉमवर उपलब्ध आहेत.

या उत्पादनांच्या किमती १२९ ते ९९९ रु. दरम्यान आहेत. बॉलपेन अल्युमिनीयम बॉडीचे असून त्याची किंमत १७९ रु. आहे. युशेप उशी कॉटन आणि नैसर्गिक लेटेक्स पासून बनविली गेली असून ती ९९९ रुपयात मिळते आहे. ती शर्ट ग्रे आणि बेज कलर मध्ये आहेत आणि ३९९ रु. ला मिळत आहेत तर बँड आणि चार्जिंग केबल १२९ रुपयात आहे. शाओमीने डास मारण्याचे यंत्रही बाजारात आणले आहे पण ते भारतात उपलब्ध नाही असे समजते.

Leave a Comment