जग्वारच्या चिमुकल्या इलेक्ट्रिक बोटीने रचला विक्रम


जग्वारच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या व्ही २० ई व्हिक्टर बोटीने मागची सर्व रेकोर्ड तोडून इतिहास रचला आहे. जग्वार व्हिक्टरचे सहसंस्थापक पीटर ड्रेडेज यांनी इंग्लंड च्या कॉन्स्टन सरोवरात ही बोट तशी १४२.६२ किमीच्या वेगाने चालविली आणि नवीन विक्रम नोंदविला. गतवेळचे रेकोर्ड १० वर्षापूर्वी नोंदविले गेले होते तेव्हा हा वेग तशी १२३.५९ किमी होता.

नव्या खास बोटीसाठी ३२० किलोची बॅटरी दिली गेली असून मागील भागात इलेक्ट्रिक मोटार आहे. फॉर्म्यूला वन इलेक्ट्रिक रेसिंग कारचे तंत्रज्ञान यात वापरले गेले आहे. यात प्रपल्शन सिस्टीम पासून पूर्ण हार्डवेअर इलेक्ट्रिक रेसिंग कार प्रमाणे डिझाईन केले गेले आहे. यासाठी विलियम्स अॅडव्हांस इंजिनिअरींग कंपनीने सहकार्य केले आहे. त्यांनी बॅटरी, मोटार आणि कंट्रोल सिस्टीन जग्वार ला पुरविली आहे.

Leave a Comment