कॅनडातील सुंदर सरोवर मोरेन लेक


कॅनडा देशालाही निसर्गाने वरदान दिलेले आहे मात्र या देशाचा बराचसा भाग गारठवून टाकणाऱ्या थंडीचा आहे. या देशात जगात जी काही सुंदर सरोवरे आहेत त्यातील एक मोरेन लेक हे आवर्जून पाहण्यासारखे सरोवर आहे. चारी बाजूनी उंच पहाडानी वेढलेले हे सरोवर बन्फ नॅशनल पार्क मध्ये येते. या सरोवरात बोटिंग करणे हा आयुष्यातला एक अद्भुत अनुभव ठरतो.

या सरोवराचे वैशिष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही अँगलने म्हणजे दाही दिशांनी किंवा गणिताच्या भाषेत ३६० डिग्री मध्ये पाहिलेत तरी प्रत्येक बाजूचे वेगळे सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे कितीही वेळ बोटिंग केले तरी मन तृप्त होत नाही. दिल मांगे मोअर अशी अवस्था होऊन जाते. येथे जाण्यासाठी मे आणि जून हा काळ सर्वोत्तम कारण त्यावेळी हे सरोवर गोठलेले नसते आणि त्याच्या निळ्याशार पाण्याचे डोळे भरून दर्शन घेता येते. हे सरोवर समुद्रसपाटीपासून १८८३ मीटर उंचीवर असून ४६ फुट खोल आहे. सुमारे ५० हेक्टर परिसरात ते पसरलेले आहे.

या सरोवरात कॅनइन किंवा कयाकिंगही करता येते. मात्र त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते ते येथे दिले जाते. यासाठी अगोदर बुकिंग करता येत नाही तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अशी पद्धत आहे. या भागात अनेक हॉटेल्स आहेत आणि अगदी ३ हजारापासून ६ हजारपर्यटन त्याचे दर आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment