आता इन्स्टाग्रामवरही करता येणार खरेदी


मुंबई : दररोज ३० कोटी युजर अॅक्टीव्ह असणाऱ्या इंस्टाग्रामने आणखी एक नवे फीचर आणले आहे. आता स्टोरीजच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर वस्तूंची विक्री केली जाणार आहे. तुम्ही फोटो शेअरिंगसोबत जाहिरात देखील पाहिली असेल. आता शॉपिंग बॅग आयकॉनसोबत स्टीकर फेसबूकचा अधिकार असलेल्या इंस्टाग्रामवर दाखवला जाईल तुम्ही त्यामध्ये शॉपिंग स्टोरी पाहू शकता.

अनेक दिवसांपासून इंस्टाग्राममध्ये या फीचरची चर्चा होती. इंस्टाग्राम स्टोरीजचे स्नॅपचॅट पाहून ऑगस्ट २०१६ मध्ये लॉन्च झालेल्या इंस्टाग्राम आता बिझनेसवर फोकस करत आहे. हे फीचर काही मोजके ब्रँड Adidas, Aritzia, Louis Vuitton यांना सुरुवातीला मिळेल. त्यानंतर ते रेग्युलर फीचर म्हणून येईल. शॉपिंग बॅग आयकॉनसह एक स्टीकर असेल. जे यूज़रला अधिक डिटेल सारखी सुविधा दाखवण्यासाठी मदत करेल. इंस्टाग्रामने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे की, आम्ही आज इंस्टाग्राम स्टोरेज फीडवरुन इतर शॉपिंगचा विस्तार करत आहोत.

Leave a Comment