पत्नीकडून १० हजार रुपये उधार घेऊन उभी राहिली २.७ लाख कोटींची ‘इन्फोसिस’ !


मुंबई : आपल्या सगळ्यांनाच देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसबद्दल तर माहित आहेच. पण नारायण मूर्ती यांचे ही कंपनी उभी करण्यामागे परिश्रम फार कमी लोक जाणतात. नारायण यांनी आपल्या पत्नीकडून १० हजार उधार घेऊन इन्फोसिस कंपनीची स्थापना केली आणि ही कंपनी आज २.७ लाख कोटींची आहे.

नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा इन्फोसिस या आयटी कंपनीच्या उभारणीमागे मोठा मोलाचा वाटा आहे. ही कंपनी त्यांनी बचत केलेल्या १० हजार रुपयांनी उभी राहिली आहे. कंपनी सुरू झाल्याच्या ६ महिन्यांनंतर २ जुलै १९८१साली ही कंपनी अधिकृतरित्या रजिस्टर झाली. कंपनीचा पत्ता ज्यामध्ये मूर्ति यांचे मित्र आणि पार्टनर राघवन यांच्या घरचा देण्यात आला होता, कारण कंपनीकडे तेव्हा खोली घेण्याची परिस्थिती नव्हती.

नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, एस. गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश आणि अशोक अरोरा यांनी १९८१ मध्ये पटनी कम्प्युटर्स सोडून इन्फोसिस कन्सल्टंट प्रा. लि.ची वाट धरली. त्यांना १९८३ मध्ये न्यूयॉर्कच्या कंपनीच्या डेटा बेसिक कॉर्पोरेशनकडून पहिली ऑर्डर मिळाली आणि या कंपनीत आता ५० हजाराहून अधिक कर्मचारी आहेत आणि त्याच्या १२ शाखा आहेत.

पण एक वेळ अशी होती की, जेव्हा कंपनीची स्थिती विचारात घेता नारायण मूर्ती यांनी कंपनी त्यांच्या सहकाऱ्यांना विकण्याचा विचार केला. कारण १९८९ मध्ये केएसएच्या समाप्तीनंतर इन्फोसिस कंपनी संकटात आली होती. संस्थापक अशोक अरोडा यांनी अशात कंपनी सोडली. नारायण मूर्ती सगळे मोठ्या धक्क्यात असताना पुढे आले आणि सगळ्यांना सोबत घेऊन कंपनी पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

इन्फोसिसचे शेअर्स १९९३मध्ये सार्वजनिक करण्यात आले. त्यानंतर कंपनीचे नाव बदलून ‘इन्फोसिस टेक्नॉलॉजीज’ असे ठेवण्यात आले. सुरूवातीला सार्वजनिक मागणीनुसार शेअर्सची किंमत ९५ रुपये ठेवण्यात आली होती. १९९४मध्ये प्रति शेअर ४५० रुपये दराने ५,५०,००० शेअर जनतेला ऑफर करण्यात आले होते. १९९९ मध्ये इन्फोसिसने जनतेच्या हिताचा आणि त्यांच्या मागण्या पुऱ्या करत १०० दशलक्ष डॉलर्सचा आकडा पार केला होता. इन्फोसिस यावर्षी नॅस्केडमध्ये निवडली गेलेली भारताची पहिली आयटी कंपनी असणार आहे.

Leave a Comment