रिलायंस सुरु करणार देशातील पहिले कार्बन फायबर युनिट


देशातील अग्रणी रिलायंस उद्योगसमूह देशातील पहिले कार्बन फायबर युनिट सुरु करण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीच्या वार्षिक अहवालात नमूद केले गेले आहे. एरॉस्पेस आणि सुरक्षा क्षेत्राची गरज यातून भागविली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या युनिटच्या माध्यमातून मॉड्यूलर टॉयलेट, घरे, पवनचक्की साठी लागणारी पाती यांना लागणारा माल तयार होणार असून कमी किमतीची पण जादा मागणी असणारी उत्पादने बनविले जाणार आहेत.

यासाठी कंपनीने थ्री डी तंत्र विकसित केले आहे. ग्राफिन, प्लास्टिक इलास्टोमर व फायबर रीन्फ़ोर्स प्रोडक्ट यामुळे तयार करणे सहज शक्य होणार आहे. भविष्यात स्टीलची जागा कार्बन फायबर घेणार असून स्वच्छ भारत मोहिमेला यामुळे हातभार लागेल असे समजते. तसेच केंद्राचा सर्वांसाठी घर योजनेलाही त्याचा फायदा मिळू शकणार आहे.

कार्बन फायबर पासून बनलेली उत्पादने स्टीलपेक्षा वजनाला हलकी तरीही जादा मजबूत असतात. स्टीलपेक्षा अधिक भार ती पेलू शकतात शिवाय ती एका जागेहून दुसरीकडे वाहून नेणे अधिक सुलभ होते. कोणत्याची हवामानात, कोणत्याची स्वरुपात ती उत्तम टिकतात आणि त्याची देखभाल कमी करावी लागते.

Leave a Comment