आता एअरटेल सुद्धा देणार डबल डेटा


टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गेल्या काही काळात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे ग्राहकांची चांगलीच चंगळ झाली आहे. खरे तर रिलायन्स जिओने या स्पर्धेची सुरूवात केली. रिलायन्स जिओचे कमी किमतीत अधिक डेटा असे धोरण होते. त्यामुळे जिओने अल्पकाळातच बाजारात चांगलीच मुसांडी मारली. पण, आता रिलायन्स जिओचा वारू रोखण्यासाठी इतर कंपन्यांनीही जोरदार प्रयत्न केले आहेत.

रिलायन्स जिओ समोर सर्वात मोठे आव्हान करणारी एअरटेल ही सध्याची आघाडीची कंपनी ठरली आहे. आपला ९९ रूपयांचा प्लान नुकताच एअरटेलने अपग्रेड केला. अपग्रेड या नव्या प्लाननुसार ग्राहकाला २८ दिवसांच्या वैधतेसोबत थेट २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानवर ग्राहकांना यापूर्वी (अपग्रेड करण्याअगोदर) १ जीबी हाय स्पीड डेटा मिळत होता.

दरम्यान, एअरटेलच्या अपग्रेड केलेल्या ९९ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री रोमिंग सारख्या सुविधाही मिळणार आहेत. तसेच, ९९ रूपयांचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना प्रतिदिन १०० एसएमएसही मिळतात. दरम्यान, सध्या हा प्लान केवळ निवडक ग्राहकांसाठीच आहे. काही काळात हा प्लान सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

Leave a Comment