येथे डॉक्टर रुपात विराजमान आहेत बजरंगबली


भारतातच नव्हे तर बाहेरच्या अनेक देशातही बजरंगबली हआनुमानाचे भक्त आहेत तशीच हनुमानाची मंदिरे परदेशातही पाहायला मिळतात. संकटमोचन करणारा असा हनुमान भारतात मंदिरातून अनेक स्वरुपात विराजमान आहे. कुठे तो दास मारुती आहे, कुठे वीर मारुती आहे तर कुठे कुटुंबवत्सल हनुमान आहे. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्यात भिंड जवळ दरोआ सरकारधाम येथील मंदिरात बजरंगबली चक्क डॉक्टर स्वरुपात विराजमान आहेत. भाविकांची अशी श्रद्धा आहे कि येथे आजारी भाविकांवर हनुमान स्वतः उपचार करतात. येथे देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

सुमारे ३०० वर्षापूर्वी हि मूर्ती लिंबाच्या झाडाखाली होती तेथेच आता मंदिर बांधले गेले आहे. या मंदिराची कहाणी अशी सांगतात कि एका साधूला दीर्घकाळ कॅन्सर होता. अनेक उपचार करून काही फायदा होत नव्हता तेव्हा हनुमान भक्त साधूने याच जागी बजरंगबलीची प्रार्थना केली तेव्हा हनुमानाने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि डॉक्टर रुपात येऊन त्याच्यावर उपचार केले. साधू पूर्णपणे कॅन्सर मुक्त झाला आणि तेव्हापासून येथील मंदिरात मारुतीची पूजा अर्चा सुरु झाली.

बजरंगबली भक्ताच्या सर्व समस्या सोडवितो आणि त्यामुळेच तो भक्तांचे असाध्य आजार बरे करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Leave a Comment