एचडीएफसी बँकेच्या सीईओला एका दिवसाला मिळतो एवढा पगार


मुंबई: एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आदित्य पुरी यांच्या वेतनात १०.५ टक्के कपात करण्यात आली असून १०.५ टक्के वेतनात कपात होऊनही ७.२६ कोटी रुपये एवढे त्यांचे वार्षिक वेतन आहे. त्याचबरोबर त्यांच्या वेतनात समाविष्ट असणारे बँकेचे शेअर आणि इतर भत्त्यांमध्ये सुद्धा ४ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आता त्यांना एका दिवसाला २.६४ लाख रुपये वेतन मिळणार आहे. त्यांना गेल्यावर्षी ८.१२ कोटी रुपये वेतन देण्यात आले होते. ४.५३ कोटी रूपये पुरी यांचे मूळ वेतन असून मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत त्यात १५ टक्के वाढ झाली आहे.

पण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वरिष्ठांना खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत कमी वेतन आहे. जगातील पहिल्या पन्नास बँकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या आणि देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांना १४.२५ लाख वार्षिक वेतन आहे.

Leave a Comment