रक्तदान करताना…


रक्तदानासारखे श्रेष्ठ दान नाही असे म्हणतात. ह्यामुळे आजवर लाखो गरजूंचे प्राण वाचले आहेत. रक्तदान करणे हे संपूर्णपणे सुरक्षित असून, नियमितपण रक्तदान शिबिरे ठिकठीकाणी आयोजित होत असतात. पण आजही रक्तदान केल्याने आपल्या शरीराला अपाय होईल अशी काहींची समजूत असते. पण ह्यामध्ये फारसे तथ्य नाही. किंबहुना रक्तदान केल्यानंतर एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये शरीरामध्ये रक्त पूर्ववत तयार होत असते. रक्तदान करणे हे समाजकल्याणकरी कार्य आहे. रक्तदान करीत असताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम, रक्तदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुमचे रक्त घेऊ शकले जाऊ शकते किंवा नाही हे जाणून घेणे गरजेचे असते. जर एखाद्या व्यक्तीला नुकताच कोणता गंभीर आजार होऊन गेला असेल, किंवा रक्तदाबाचा विकार असेल, तर त्या व्यक्तीचे रक्त शक्यतो घेतले जात नाही. जर तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल, आणि तुम्ही रक्तदान करणार असाल, तर रक्तदान करण्याच्या एक दिवस आधीपासून धुम्रपान बंद करावे, तसेच रक्तदान केल्यानंतर तीन ते पाच तास धुम्रपान करू नये. रक्तदान केल्यानंतर दर तीन ते चार तासांनी पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. अश्या वेळी आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश जास्त असावा.

रक्तदान केल्यानंतर बहुतेकवेळी रक्तदात्याला त्वरित पॅकेज्ड ज्यूस, बिस्किटे इत्यादी पदार्थ खाण्यासाठी दिले जातात. पण हे पदार्थ टाळून शक्यतो ताजी फळे, भाज्यांची सूप्स, आणि इतर पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ले जावेत. त्याचबरोबर योग्य मात्रेमध्ये पाणी पीत राहणे ही आवश्यक आहे. रक्तदान केल्याच्या बारा तासांपर्यंत कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणे टाळावे. रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरातील रक्ताभिसरण पूर्ववत होणे आवश्यक असते. त्यामुळे रक्तदान केल्यानंतर जास्त शारीरिक श्रम करु नयेत. रक्तदान करण्याच्या दोन दिवस आधीपासून मद्यपान वर्ज्य करावे.

रक्तदान केल्यानंतर केवळ तरल पदार्थ न घेता व्यवस्थित पौष्टिक अन्न घ्यावे. केवळ तरल पदार्थ घेतल्याने शरीरामध्ये अशक्तपणा येऊ शकतो. तसेच एका वेळी ४७१ मिलीलीटर पेक्षा अधिक रक्तदान करू नये. रक्तदान केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते अशी काहींची समजूत असते, पण ह्यामध्ये तथ्य नाही. अठरा वर्षे वयाच्या वरील कोणीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. अठरा वर्षांवरील निरोगी पुरुष तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात, तर महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात. हे पूर्णतया सुरक्षित आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment