‘रेस ३’ अपेक्षा पुर्ण करण्यात ठरला अयशस्वी


सलमान खान आणि त्यांच्या गँगचा रेस ३ हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून काल चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच या चित्रपटावर प्रतिक्रिया येत होत्या. या चित्रपटाच्या प्रोमोतच आपण हा चित्रपट फुल ऑन बॉलिवूड मसाला असून यामध्ये अॅक्शन, डान्स, रोमान्स, थ्रिल सर्व काही असल्याचे पाहिले होते. पण प्रत्यक्षात अपेक्षा पुर्ण करण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला आहे.

या चित्रपटाची कथा शमशेर (अनिल कपूर) पासून सुरु होते. आयलँड अल शिफामध्ये शमशेर हा अवैध पध्दतीने हत्यार सप्लाय करण्याचे काम करतो. हा व्यवसाय भारतात सुरु करणे हे त्याचे स्वप्न असते. पण तो असे त्याच्या क्रिमिनल रेकॉर्डमुळे करु शकत नाही. शमशेरचा राणा(फ्रेडी दारुवाला) प्रतिस्पर्धी आहे. दोघांमध्ये बिझनेसमुळे अनेक वेळा खटके उडत असतात. तर शमशेरचा सिकंदर(सलमान खान) हा सावत्र मुलगा आहे. शमशेरला संजना (डेजी शाह) आणि सूरज (शाकिब सलीम) हे अजून दोन मुले आहेत. शमशेरसोबत हे तिघेही काम करत असतात. सिकंदरचा यश (बॉबी देओल) बॉडी गार्ड आहे. सिकंदरची जैसिका (जॅकलीन फर्नांडिज) गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे.

रेमो डिसूजाच्या दिग्दर्शनामध्ये तयार झालेल्या या चित्रपटात अनिल कपूरने उत्तम अभिनय केला आहे. इतर स्टारकास्टचा अभियन ठिकठाक आहे. हा पुर्ण चित्रपट भव्य आणि स्टायलिश असून चित्रपट पाहून वाटते की हा चित्रपट डायरेक्टर रेमो डिसूजाने ओढून ताणून वाढवला असून त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटतो. ‘रेस’ आणि ‘रेस 2’ पेक्षा भव्य चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी असे केले असावे असे वाटते. शिराज अहमदने चित्रपटाची कथा लिहिली आहे. इमोशन्सची चित्रपटात कमतरता पाहायला मिळते. चित्रपटात अनेक डायलॉग्स रिपीट असून ते खुप मोठे आहेत. हा एक अॅक्टशन थ्रीलर चित्रपट असून यातील काही सीन्स वगळता तर इतर सर्व सीन्स स्लो आहेत. चित्रपटाचा फर्स्ट पार्ट स्लो आहे. चित्रपटाची कथा विनाकारण ओढली आहे. चित्रपटात सलमान व्दारे लिहिलेले गाणे निराशाजनक असून म्हणजेच सलमानचा हा चित्रपट आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आहे असेच म्हणावे लागेल.