चला मुन्नारला, निलकुरुंजीचा बहर पाहायला


द. भारतातील केरळ हे अनेक पर्यटकांचे आवडते पर्यटन ठिकाण आहे. केरळचे मुन्नार हा त्यातील जणू जडावाचा दागिना. चारी बाजूनी उंच पहाड, चहा कॉफीचे मळे, थंडगार हवा, नजर जाईल तिथवर हिरवळ, धबधबे, स्वच्छ पाण्याचे अनेक झरे यांनी नटलेले मुन्नार अनेकांनी पहिले असेल, तरीही यंदा पुन्हा बॅगा भरून ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत जायला हवे. सप्टेंबर ऑक्टोबर या काळात गेले तर सोन्याहून पिवळे ठरणार कारण यंदा १२ वर्षानंतर पुन्हा एकदा मुन्नारचा निसर्ग नीलकुरुंजीच्या बहराने निळा होणार आहे.


निलकुरुंजीची हि फुले दर १२ वर्षांनी फुलतात आणि केरळ त्यातही मुन्नारचा अवघा परिसर निळा करून सोडतात. गतवेळी हा बहार २००६ मध्ये आला होता आणि या नंतर तो पाहण्यासाठी २०३० सालची प्रतीक्ष करावी लागणार आहे. ऑगस्ट मध्ये सुरु होणाऱ्या या बहराने मुन्नारचे डोंगर, दरया, कुरणे, जमीन सारीकडे निळ्या रंगाचे साम्राज्य पसरणार आहे आणि निसर्गाचा हा अनमोल खजिना नक्कीच न्याहाळायला हवा.

Leave a Comment