दिव्या सूर्यदेवरा बनल्या जनरल मोटर्सच्या पहिल्या महिला सीएफओ


भारतीय वंशाच्या ३९ वर्षीय दिव्या सूर्यदेवरा अमेरिकेतील बलाढ्य ऑटो कंपनी जनरल मोटर्सच्या पहिल्या महिला सीएफओ बनल्या असून त्या त्याचा पदभार सप्टेंबर मध्ये स्वीकारणार आहेत. जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बर्स्त या संदर्भात म्हणाल्या दिव्याने कंपनीच्या आर्थिक बाबीत मोठे योगदान दिले असून कंपनीच्या अनेक महत्वाच्या सौद्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या वर्षी त्या कंपनीच्या उपाध्यक्ष पदवर होत्या. त्याच्या अनुभवाचा कंपनीला खूप उपयोग होणार आहे.

दिव्या यांचा जन्म चेन्नैचा असून त्यांनी त्याचे पदवी शिक्षण वाणिज्य शाखेतून पूर्ण केल्यावर नोकरीचा काही काळ अनुभव घेतला आणि नंतर हॉवर्ड विद्यापीठातून मास्टर्स इन बिझिनेस पदवी मिळविली आणि २५ व्या वर्षी जनरल मोटर्स जॉइन केली. २०१६ मध्ये त्यांना ऑटो क्षेत्रातील रायझिंग स्टार बक्षिसाने गौरविण्यात आले होते.

Leave a Comment