असे आहेत स्तनपानाचे लाभ


नवजात अर्भकासाठी आईचे स्तनपान अतिशय आवश्यक मानले जाते. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आजारांशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती आईच्या दुधामुळे बाळाच्या शरीरात उत्पन्न होत असते. तसेच बाळाच्या पोषणासाठी, योग्य वाढीसाठी आवश्यक असेलली सर्व तत्वे बाळाला आईच्या दुधातून मिळत असतात. ह्याच कारणांसाठी नवजात अर्भक किमान सहा महिन्यांचे होई पर्यंत त्याला स्तनपान केले जाणे अत्यावश्यक आहे. ही बाब सिद्ध करणारे अनेक शोध शास्त्रज्ञांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

ह्या शोधांच्या मते, आईच्या दुधातून मिळणारी शर्करा भविष्यामध्ये उद्भवू शकणाऱ्या रोगांपासून बाळाला संरक्षण देणारी असते. आईच्या दुधामध्ये ऑलीगोसॅकरॉइड्स ( एचएमओ ) तत्वे असतात. ह्यांच्या संरचनेमध्ये जटील शर्करेचे मॉलिक्युल्स असतात. आईच्या दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टोज आणि फॅटस् बरोबरच हे शर्करेचे मॉलिक्युल्स आईच्या दुधाचे पोषण मूल्य वाढविण्यास सहायक असतात.

कॅनडा येथील विनिपेग विद्यापीठामध्ये केल्या गेलेल्या एका रिसर्चच्या दरम्यान मूल एक वर्षाचे झाल्यानंतर जेव्हा त्याच्या त्वचेचे परीक्षण केले गेले, तेव्हा असे आढळून आले, की ज्या मुलांना स्तनपान करविले गेले होते, त्या मुलांना वरील अन्नपदार्थांपासून कोणत्याही प्रकारची अॅलर्जी उद्भविली नाही. ह्याचाच अर्थ असा, की मुलांना जेव्हा आईच्या दुधाखेरीज इतर खाद्यपदार्थ देण्यास सुरुवात केली गेली, तेव्हा ते खाद्यपदार्थ पचविण्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कारण वरील अन्न पचविण्यासाठी लागणारे प्रोबायोटिक्स मुलांना आईच्या दुधाद्वारे मिळत असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment