‘बजेट-फ्रेंडली’ पद्धतीने सजवा घराची बाल्कनी


आताच्या काळामध्ये घरांच्या किंमती गगनचुंबी इमारतींसारख्याच आकाशाला भिडू पहात आहेत. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये बसेल असे घर घेऊन त्याची आपल्या मनाप्रमाणे आणि काही अंशी अलीकडच्या काळतील ‘ट्रेंड्स’ लक्षात घेऊन घराची सजावट पकरण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यादृष्टीने अलीकडे सोशल मिडियावरील अनेक साईट्स आपल्या उपयोगी पडू शकतात. ह्यावर शेअर केल्या जाणाऱ्या गृह सजावटीच्या अनेक कल्पना, टिप्स ह्यांच्या मदतीने आपल्याला आपल्या घराची सजावट खिशाला परवडेल अश्या रीतीने करता येऊ शकते. घराची सजावट करताना घराची लहानशी गच्ची किंवा बाल्कनी ह्या भागाकडे मात्र म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. पण केवळ काही कल्पना अंमलात आणल्या तर घराचा हा लहानसा हिस्सा देखील अतिशय आकर्षक बनू शकतो, आणि ते ही अगदी फार जास्त पैसे खच न करता. ह्यासाठी काही टिप्स.

आपल्या बाल्कनीच्या सजावटीकरिता बाल्कनीच्या एका कोपऱ्यामध्ये आपण दोन खुर्च्या आणि एक लहानसे टेबल ह्यांच्या आकर्षक मांडणी करून एक छानसा ‘सिटींग कॉर्नर’ बनवू शकतो. टेबल आणि खुर्च्यांचा वापर करण्याऐवजी एखादा लहानसा बेंच, किंवा दिवाण वापरून सुंदर बैठक तयार करता येईल. तसेच ह्या ठिकाणी सजावटीच्या लहान मोठ्या वस्तूंची आकर्षक मांडणी करू शकतो. ह्या वस्तूंमध्ये टेराकोटाच्या किंवा चीनी मातीच्या वस्तूंचा समावेश केला जाऊ शकतो. कुंड्या खरेदी करताना त्यासोबत आकर्षक प्लांटर्स खरेदी करून आपल्या बाल्कनीची शोभा आणखीन वाढविली जाऊ शकते. योग्य ठिकाणी केलेल्या दिव्यांच्या मांडणीमुळे देखील सजावट आणखी उठून दिसण्यास मदत होते.

Herkese merhaba🙋🏻‍♀️ Anket sonuçları başa baş gittiği için kimsecikleri kırmayacağım bugün balkon yarın aydınlatma üzerine öneriler sunacağım🤗 Sizi bilmem ama balkon deyince benim aklıma ilk gelen yıldızların altında yastıklara gömülüp çay eşliğinde saatlerce arkadaşlarıma pişti falı bakabileceğim bir alan geliyor😄Böyle bir alan oluşturabilmeniz için gerekli ürünler ektedir efendim. 😎 (Kaydırmalı👉🏻) Önce @bauhausturkiye ‘den sandıklı sediri alıyorsunuz, üzerine @vivensecom ‘dan aldığınız uygun fiyatlı minderleri bir güzel döşeyip koltuk şalını seriveriyorsunuz. Paylaşımdaki ampuller artık çok sıradanlaştı, her yerde var. Balkonlarınıza bir renk gelsin lambalar kesinlikle @funnylights ‘tan olsun tarzınız konuşsun😄 Ayrıcaaa balkonunuzda uygun bir duvarınız varsa bir tarz katmak isterseniz bir cephede @neo_creative_surfaces ‘ten bir ürün seçmenizi şiddetle tavsiye ederim😍. Mümkünse yeni tasarladıkları “Çıbıklı” tile talep edin, en yeşilinden😉 (başınıza iş açtım yine😌) #arch #architecture #archery #architectural #photography #architecturelovers #architectureporn #interiordesign #interiorlovers #interiorarchitecture #interiorandhome #details #detailsoftheday #designispiration #archilovers #luxury #luxurydesign #interiors #render #3ds #dekorasyon #tasarım #bursa #balkon #balkondekorasyonu #balcony #balconydecor #light #lighting #lightingdesign

A post shared by Sevde Kasa (@sevdekasa) on


कुंड्यांची मांडणी करताना सर्व कुंड्या एकाच ठिकाणी न ठेवता, त्यांच्या उंची आणि रुंदीप्रमाणे, तसेच त्यामध्ये लावलेली झाडे किती लहान किंवा मोठी आहेत ह्याचा विचार करून त्यानुसार कुंड्यांची रचना करावी. तसेच बाल्कनीच्या भिंतींवर एखादे आकर्षक वॉल हँगिंग लावून, किंवा भिंतीवर वारली पेंटिंग किंवा तत्सम वॉल आर्टद्वारे त्या भिंतीला आणि संपूर्ण सजावटीला अजून शोभा आणता येईल. बाल्कनीचा वापर घरातील जास्तीचे सामान ठेवण्यासाठी करायचा असेल, तर त्या वस्तू नुसत्याच रचून न ठेवता, त्यासाठी एखादे लहानसे कपाट किंवा शेल्फ असावे.

Leave a Comment