अभिनि रॉय बनली रोल्स रॉयस एसयूव्हीची पहिली भारतीय महिला मालक


नामवंत ब्रिटीश ऑटो कंपनी रोल्स रॉयस कुलीननची पहिलीवाहिली एसयूव्ही उपलब्ध झाल्यानंतर जगातील काही व्यक्ती तिच्या मालक बनल्या आहेत. भारतात हा मन अभिनि रॉय या महिलेला मिळाला आहे आणि विशेष म्हणजे तिला हि गाडी गिफ्ट मिळाली आहे.

अभिनि सोहन याच्या लग्नाचा यंदा २५ वा वाढदिवस आहे. त्यांचे पती सोहन रॉय दुबईत एरीज ग्रुपचे संचालक आहेत. त्यांनी हि कार पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिली असून वाढदिवशी म्हणजे डिसेंबर मध्ये हि कार त्यांच्या घरी पोहोचणार आहे. या गाडीची किंमत २.२ कोटी रुपये असून आयात कारसह ती ५.५ कोटी रुपयांना पडणार आहे.

कंपनीने ही एसयूव्ही फँटम ८ वरून प्रेरणा घेऊन बनविली आहे. या कारला एक स्पेशल इलेक्ट्रिक सीट असून बटण दाबून ती फोल्ड करता येते. कारला ६.७५ लिटर क्षमतेचे व्ही १२ इंजिन दिले गेले असून बर्फ, वाळू, गावात, मैदान अशी कुठेही ती चालविता येते कारण त्यासाठी वेगळे ड्रायविंग मोड तिला दिले गेले आहेत.

Leave a Comment