ओप्पोचा रिलमी १ सिल्वर स्मार्टफोन लाँच


चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्याच्या रिलमी १ स्मार्टफोन मून सिल्वर कलर मध्ये लाँच केला असून १८ जून पासून तो अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या फोनची किंमत ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज व्हेरीयंट साठी १०९९० रु.आहे. यापूर्वी कंपनीने डायमंड ब्लॅक आणि सोलर रेड रंगात हा फोन आणला होता. त्यावेळी तो ३, ४, ६ जीबी रॅम आणि अनुक्रमे ३२, ६४, १२८ जीबी स्टोरेज अश्या व्हेरीयंट मध्ये होता.

सिल्व्हर कलरमध्ये हा फोन ६ इंची फुल एचडी स्क्रीन, अतिशय पातळ बेजल, अँड्राईड ओरिओ आधारित कलर ओ एस ५.०, फोटोग्राफीसाठी पीडीएएफ डेफत मोड मध्ये १३ एमपी चा रिअर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ३४१० एएमएच बॅटरी अश्या फिचरसह आहे. ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज अशी दोन व्हेरीयंट असून स्टोरेज मायक्रोकार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. हा फोन ४ जी ला सपोर्ट करतो.

Leave a Comment