सावत्र आईवर भय्यू महाराजांच्या मुलीचे गंभीर आरोप


इंदूर: तणावामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख भय्यू महाराज यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. पण त्यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. भय्यू महाराजांनी टोकाचे पाऊल पत्नी आणि पहिल्या पत्नीची मुलगी यांच्यातील वादामुळे उचलल्याची शक्यता आहे.

दरम्यान सावत्र आईवर भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने आरोप केले आहेत. कुहू ही भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवीची मुलगी आहे. त्यांची दुसरी पत्नी आयुषी आणि कुहू यांच्यात अलबेल नव्हते. कुहूने भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर आयुषी यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांनी आत्महत्या सावत्र आईमुळेच केली, असा आरोप कुहूने केला आहे. तर मी कुहूला आवडत नसल्याने ती असे आरोप करत असल्याचे आयुषी यांनी म्हटले आहे.