वैष्णोदेवी यात्रेसाठी नव्या मार्गाला भाविकांची पसंती

.
जम्मू काश्मीर मधील वैष्णोदेवी मातेच्या यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. यंदा वैष्णोदेवीला जाण्यासाठी नवा मार्ग सुरु झाला असून या रस्त्याला भाविकांनी अधिक पसंती दिली आहे. परिणामी जुन्या मार्गावरची गर्दी व त्यामुळे होणारी कोंडी कमी झाली आहे. या नव्या मार्गाचा वापर १३ मे पासून सुरु झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी १९ मे रोजी त्याचे अधिकृत उद्घाटन केले होते.

वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार कटरा आणि अर्धकुवारी हा ७ किमीचा नवा मार्ग असून या रस्त्यावर सर्व सुविधा दिल्या गेल्या आहेत. रेस्टोरंट, खाण्यापिण्यासाठी लागणारया किरकोळ मालाची तीन दुकाने, १३ आरओ पिण्याच्या पाण्यासाठी केंद्रे तसेच ६ अल्ट्रा फिल्टर पाणी एटीएम्स यांची सुविधा असून हा मार्ग अगदी स्वच्छ राखला जात आहे. या मार्गावर वृक्षारोपंही केले गेले आहे. परिणामी यंदा या मार्गाचा वापर भाविक मोठ्या संख्येने करत आहेत.