मॅक्लारेन आता भारतातही मिळणार


स्पोर्ट्स कारच्या दुनियेत मॅक्लारेनची जादू काहीवेगळीच म्हणावी लागेल. अर्थात भारतात स्पोर्स कार्स क्रेझींची संख्या खूप असूनही ही कार भारतात फारशी दिसत नाही याचे मुख्य कारण म्हणजे ही कार आयात करावी लागते. आता मात्र मॅक्लारेन लवकरच भारतही मिळू लागणार आहे. कंपनीने त्यासाठी दिल्लीच्या सिलेक्ट कार्स बरोबर करार केला असल्याचे समजते. या डीलरकडे रोल्स रॉइस, फेरारी, लोम्बार्गिनी, बीएमडब्ल्यू, मिनी, अॅस्टीन मार्टिन या कार्स साठी डीलरशिप आहे.

भारतात लेफ्ट हँड ड्राईव्हच्या ५४० सी, ५७० जीटी, ५७० कुपे, ५७० एस स्पायडर या कार्स उपलब्ध आहेत. त्यात आता मॅक्लारेनचे नाव सामील होऊ शकेल. कंपनीने दरवर्षी १० गाड्या भारतात विकायचे उदिष्ट ठेवली असल्याचे सांगितले जात आहे.