सिंगापूर भेटीवर येताना टॉयलेटसह आला होता किम जोंग उन


जगाच्या दृष्टीने ऐतिहासिक बनलेली डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन याची भेट अखेरी झाली असली तरी किम जोंग उनने त्याच्या सुरक्षेची कशी खबरदारी घेतली होती याच्या बातम्या अजून चर्चेत आहेत. सिंगापूर दौऱ्यावर येताना किम जोंग उन त्याचे खासगी टॉयलेट बरोबर घेऊन आला होता असे उघड झाले आहे. किमने त्याच्या विमानातून ज्या गोष्टी सोबत आणल्या त्यात बुलेट प्रुफ कार बरोबर या टॉयलेटचाही समावेश होता.

किमने सिंगापूरला पोहोचण्याअगोदर दोन रिकामी विमाने पाठवून सुरक्षेची खात्री करून घेतली होती आणि त्यानंतर तिसऱ्या विमानातून तो सिंगापूरला पोहोचला होता. द.कोरियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार किमच्या बुलेटप्रुफ कारमध्ये त्याचे वैयक्तिक टॉयलेट होते. उत्तर कोरियातून गार्ड कमांड युनिटमधून पलायन करून द. कोरियात आश्रय घेतलेल्या एका अधिकाऱ्याने किम जोंग उन जेथे जाईल तेथे स्वतःचे टॉयलेट बरोबर नेतो ही खास माहिती उघड केली होती.

या मागचे कारण देताना हा अधिकारी म्हणाला कि, किम जोंग उन त्याच्याबद्दलची कुठलीच माहिती बाहेर येऊ नये याची खूप काळजी घेतो. टॉयलेट बरोबर नेण्यामागे हीच भीती आहे. त्याला त्याच्या मलमूत्राचा नमुना कुणी चोरून नेईल आणि त्याची तपासणी करून किमला असलेल्या अनेक आजारांसंबंधी माहिती मिळवेल अशी नेहमी भीती वाटते.