फुटबॉल सामन्यात सरासरी ११ किमी धावतो खेळाडू


फिफा वर्ल्ड कपचा धमाका उद्या रशियात सुरु होत आहे. खेळाडूकडून स्ट्रेंथ आणि स्टॅमीना याची सर्वात मोठी मागणी करणारा हा खेळ. अतिशय वेगवान आणि तितकाच दमाविणारा खेळ जगात लोकप्रिय आहे. मात्र विश्व कप साठी खेळाडूची निवड होणे म्हणजेच मोठे मैदान मारण्यासारखे असते.

या खेळात खेळाडू १ सामन्यात सरासरी ११.२ किमी धावतो म्हणजे फुटबॉलच्या मैदानाला १२० फेऱ्या मारण्याएवढे अंतर धावतो. तेही ९० मिनिटात. यात त्याच्या १५०० कॅलरी खर्ची पडतात आणि शरीरात कर्बोदके आणि प्रथिने याचे प्रमाण घटते. हि खर्च झालेली उर्जा परत भरून काढण्यासाठी त्याला १२ ते १४ तास लागतात. यातही मिडफिल्ड खेळाडू अधिक व्यस्त असतात. ते १५ किमी पेक्षाही अधिक धावतात त्यामामाने गोलकीपर सर्वात कमी धावतो.

क्रिकेटमध्ये खेळाडूच्या धावण्याचे सरासरी प्रमाण १२ किमी असले तरी त्यासाठी खेळाडू ८ ते ९ तास घेतात तर फुटबॉल खेळाडूकडे फक्त ९० मिनिटे असतात. हॉकी मध्ये हेच प्रमाण ९ किमी आहे तर बास्केटबॉल मध्ये खेळाडू ४८ मिनिटात साडेचार किमी धावत असतो. युईफ २०१८ मध्ये चँपियन लीग खेळताना इजिप्तचा मोहम्मद सालाह सर्वात वेगवान फुटबॉल खेळाडू ठरला होता. त्याचा टॉप स्पीड ताशी ३३ किमी होता. रोनाल्डो आणि नेमार याचा हाच वेग ताशी ३१ किमी होता तर मेस्सीचा हा वेग ताशी २८ किमी होता.