अमेरिकन लष्कराला मिळणार ब्लॅक होर्नेट नॅॅनो ड्रोन


अमेरिकन लष्करातील कुणीही सैनिक सहज वापरून हेरगिरी करू शकेल तसेच युद्धभूमीची बारीक माहिती मिळवू शकेल असा छोट्या किड्याच्या आकाराचे ड्रोन अमेरिकन लष्कराला पुरविले जाणार आहेत. ब्लॅक हार्नेस्ट ३ असे या ड्रोनचे नाव असून त्याचे वजन अवघे ३२ ग्राम आहे.

हा ड्रोन चतुर अथवा पतंग किड्याच्या आकाराचा असून हा नॅनो ड्रोन आहे. तो २१ किमी प्रती तास या वेगाने उडू शकतो आणि रडारवर दिसत नाही. २ किमी परिसराची बारीक सारीक माहिती तो देऊ शकतो आणि रिमोटने कंट्रोल करता येतो. त्यात थर्मल मायक्रो कॅमेरा असून कमी प्रकाश अथवा धुक्यात सुद्धा त्यामुळे स्पष्ट फोटो काढले जातात. हे फोटो टॅब्लेट च्या आकाराच्या डिस्प्लेवर पाहता येतात.

हा ड्रोन सैनिकाच्या खिशात आरामात मावतो आणि हातावर ठेऊन उडविता येतो. सैनिकांना आर्टिफिशीयल इंटेलीजंस आणि मशीन लर्निंग प्रोग्राम शिकविण्यासाठी हे ड्रोन वापरले जाणार आहेत. अमेरिकेपूर्वी फ्रांस, ऑस्ट्रेलिया सह ३० देशांच्या लष्कराना असे ड्रोन कंपनीने दिले आहेत असे समजते.