अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’चे पोस्टर रिलीज


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘गोल्ड’चे नुकतेच पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अक्षय कुमारचा हा चित्रपटा चर्चेत आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. अक्षय कुमार चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये भरपूर सीरियस लूकमध्ये दिसत असून १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.


हे पोस्टर अक्षय कुमारने रिलीज केले असून यात अक्षय कुमार भारताचा झेंडा आपल्या उराशी घेताना दिसत आहे. अक्षयच्या डोळ्यात देशासाठी ऑलम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याची आग दिसत आहे. फक्त अक्षयच नाही तर संपूर्ण हॉकी टीम या पोस्टरमध्ये दिसत आहे. या अगोदर रिलीज झालेल्या सर्व पोस्टरमध्ये फक्त अक्की दिसत होता. त्यामुळे हे पोस्टर खास आहे. अक्षय पोस्टर शेअर करताना म्हणतो की, देश तेव्हाच बनतो जेव्हा सगळ्या देशवासियांच्या डोळ्यात एकच स्वप्न असते. मौनी रॉय या चित्रपटांतून डेब्यू करत आहे.