या आहेत इको फ्रेंडली शॅम्पूच्या वड्या


पर्यावरणावर प्लास्टिकमुळे होत असलेले दुष्परिणाम ही आजच्या काळतील अतिशय महत्वाची, आणि गंभीर बाब आहे. ह्या वर नियंत्रण मिळविण्यासाठी जगातील अन्य देशांप्रमाणे भारतही प्रयत्नशील आहे. ह्याची सुरुवात म्हणून भारतामध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या, काटे-चमचे, ग्लासेस, प्लेट्स, डबे इत्यादींच्या वापरावर बंदी घालण्यात आली असली, तरी आपल्या रोजच्या जीवनात प्लास्टिकचा वापर केवळ ह्या वस्तूंच्या पुरताच मर्यादित नाही. अगदी दररोजची कामे विचारात घ्यायची म्हटली, तरी आपल्या कळत-नकळत किती तरी प्लास्टिक आपण आजही वापरत आहोत. आता अगदी आंघोळीचे उदाहरण घेऊ या. दररोज वापरल्या जाणाऱ्या आपल्या आवडत्या शॅम्पूची बाटली देखील प्लास्टिकचीच असते. ही बाटली रिकामी झाल्यावर ती आपण फेकून देतो. जगभरामध्ये दररोजच्या हिशोबाने लाखोंच्या संख्येने शॅम्पूच्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकून दिल्या जात असतात. हे प्लास्टिक देखील पर्यावरणाच्या दृष्टीने तितकेच घातक आहे.

ह्याला पर्याय म्हणून आता शॅम्पू बार्स अमेरिकन बाजापेठेमध्ये उपलब्ध होऊ लागले आहेत. साबणाच्या गोलाकार वडी प्रमाणे दिसणाऱ्या ह्या बार्स मध्ये, तीन मध्यम आकाराच्या बाटल्यांमध्ये मावेल इतका शॅम्पू आहे. एका बारच्या मदतीने ऐंशी वेळा किंवा त्याही पेक्षा जास्त वेळा केस धुता येतात. ह्या बार्सच्या पॅकेजिंग साठी प्लास्टिकची आवश्यकता नाही. ह्याचप्रमाणे आपण वापरत असलेले हँडवॉश, बॉडीवॉश देखील शॅम्पूप्रमाणे बार्सच्या रुपात उपलब्ध झाले, तर प्लास्टिकचा वापर किती तरी पटीने कमी होईल.

हे शॅम्पू बार्स दररोज वापरण्याच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित असून, ह्यांच्यापैकी अनेक बार्समध्ये केवळ नैसर्गिक तत्वांचा वपर केला गेला आहे व कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा ह्यामध्ये समावेश नाही. यामुळे हे शॅम्पू बार्स केसांसाठीच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीने देखील वरदानच म्हणायला हवेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment