नैसर्गिकदृष्ट्या संपन्न पण आर्थिक दृष्ट्या गरीब देश मादागास्कर


आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर हिंद महासागरात असलेल्या मोठ्या बेटावर वसलेला मादागास्कर हा देश अनेक कारणांनी अद्भुत आहे. हिंद महासागरातील हे बेट चौथ्या नंबरचे मोठे बेट आहे. विशेष म्हणजे येथील रहिवासी बोर्नियो, ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशियातून आलेले असून वस्ती केल्यानंतर ५०० वर्षे ते आफ्रिकेत सामील झालेले नव्हते. या बेटाला नैसर्गिक समृद्धीचे वरदान आहे मात्र आर्थिक दृष्ट्या हा देश मागासलेला म्हणावा लागेल.


या बेटावर उगविणाऱ्या वनस्पतीतील ८० टक्के औषधी आहेत. तसेच जगाची व्हॅनिला ची ८० टक्के गरज हा देश भागवितो. कॉफी, साखर, शेलफिश, कॉटन, पेट्रोलियम उत्पादने आणि क्रोमाईट हि येथील प्रमुख संपदा. मात्र तरीही या देशातील शिक्षण, आरोग्य, स्वास्थ्य, कुपोषण अश्या समस्या सुटू शकलेल्या नाहीत. या बेटावरच्या मातीचा रंग लाल आहे आणि त्यामुळे त्याला रेड आयलंड म्हणूनही ओळखले जाते.

या देशाचा पारंपारिक वेश लांबा नावाने ओळखला जातो आणि स्त्री पुरुष एकसारखेच कपडे वापरतात. या लहान मुलांचे कापडे, विवाहासारख्या मंगल प्रसंगी वापरायचे कपडे , वृद्धांसाठी कपडे इतकेच काय पण मृत्युनंतर शवावर घालायच्या कापडालाही लांबाच म्हटले जाते.


येथील मोरासिंगी फाईट क्लब लोकप्रिय खेळ असून कोणत्याही शस्त्राशिवाय हातानेच तो खेळला जातो. येथे फुटबॉल लोकप्रिय असला तरी त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे रग्बी. या देशाची राजधानी आहे अन्तान्नेरीवो. बेटावरची बहुसंख जनता येथेच राहते. १७०० ते १८०० या शतकात हा देश युरोपीय समुद्री चाचे आणि व्यापारी याचे लोकप्रिय आश्रयस्थान म्हणून ओळखला जात होता.

Leave a Comment