ओप्पोचा ५ जी स्मार्टफोन फाईंड एक्स १९ जूनला येणार


चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो येत्या १९ जूनला त्याचा पहिला ५ जी तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा स्मार्टफोन पॅरीस येथे लाँच करणार असल्याचे वृत्त आहे. फाईंड सिरीज मधला हा नवा स्मार्टफोन फाईंड एक्स नावाने बाजारात आणला जात आहे असे टेक साईटवर नमूद केले गेले आहे. फाईंड सिरीजचा फोन कंपनीने २०१४ मध्ये प्रथम सादर केला होता त्यानंतर ४ वर्षांनी पुन्हा या सिरीजचा स्मार्टफोन कंपनी बाजारात आणत आहे असे समजते.

फाईंड एक्स जून अखेरी विक्रीसाठी उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे. या फोनची सर्व फिचर अजून जाहीर केली गेलेली नाहीत मात्र लिक माहितीनुसार या फोनला विवो एक्स २१ प्रमाणे अंडरडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅंनर दिला जाईल. ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर, व्हीओसीसी फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाईल. या मुळे १५ मिनिटे चार्जिंगवर दिवसभराचा बॅटरी बॅकअप मिळेल असे समजते. फोन बरोबर एस पेन दिले जाईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment