एअरटेलचा हा प्लान जिओला पडणार फिक्का


मुंबई : भारती एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या प्रीपेड टेरिफ प्लानमध्ये अनेक बदल केले आहेत. आता एअरटेल नव्या प्लानच्या माध्यमातून आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओला टक्कर देणार आहे. एअरटेलने लॉन्च केलेला हा प्लान ५५८ रुपयांचा आहे.

ग्राहकांना या प्लान अंतर्गत प्रति दिन ३ जीबी इंटरनेट डेटा मिळणार असून याची वैधता ८२ दिवसांची असणार आहे. त्यामुळे ५८५ रुपयांत ग्राहकांना एकूण २४६ जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या या नव्या प्लानमध्ये लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड वॉईस कॉलिंग तसेच प्रति दिन १०० एसएमएस मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या ५०९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना प्रति दिन ४ जीबी ४जी डेटा मिळतो. पण याची वैधता केवळ २८ दिवसांचीच आहे.

दरम्यान, एअरटेलने नुकताच आपला एक स्वस्त प्लान लॉन्च केला असून १४९ रुपये एवढी या प्लानची किंमत आहे. ग्राहकांना यामध्ये प्रति दिन २ जीबी डेटा मिळणार आहे.

Leave a Comment