चीनमधले हे ओसाड गाव बनतेय पर्यटकांचे आकर्षण


चारीबाजूनी डोंगर, खाली समुद्र, त्यात छोटीछोटी ओसाड असलेली छोटी छोटी घरे. घरावर लपेटलेल्या वेली आणि पाहावे तिकडे माजलेले हिरवेगार गवत असे एखादे गाव पहिले तर ते भुतांनी झपाटलेले असावे असा कुणाचाही समज होईल. चीन मध्ये याच वर्णनाचे एक गाव पूर्व शेंगशान बेटावर असून त्याचे नाव आहे हुतोवान. या गावात सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांची वस्ती आहे. मात्र सध्या हे गाव पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.


या गावाच्या प्रथम दर्शनात दिसते चारी बाजूनी माजलेले गावात, गावातील प्रत्येक घराला हिरव्यागार वेलींनी घातलेले विळखे आणि कमालीची शांतता. जणू हॉलीवूडच्या हॉरर चित्रपटाचा सेट असावा असे हे गाव. ५०० घरांच्या या गावात २ हजार मच्छिमारांची वस्ती होती. मात्र हे गाव मुख्य रस्त्यापासून इतके दूर होते कि शिक्षण सुविधा देता येत नव्हत्या तसेच सामानाची ने आण करणेही दुरापस्त होते.


१९९० च्या सुमारास येथील लोकांनी चांगल्या जीवनमानासाठी येथून स्थलांतर सुरु केले आणि १९९४ पर्यंत जवळ जवळ सर्व कुटुंबे येथून गेली. आता मुठभर लोक या गावात आहेत. निसर्गाने या गावावर त्याचा कब्जा केला आहे आणि तेच पर्यटकांसाठी मोठे आकर्षण बनले आहे.

Leave a Comment