बीएमडब्ल्यूची नवी रेसिंग कार झेड ४


बीएमडब्ल्यूची नवी रेसिंग सेन्सेशन कार झेड ४ नुकतीच टेस्टिंग दरम्यान दिसली असून ती लवकरच बाजारात दाखल होत आहे. ही कार रेसिंग मास्टर लोम्बार्गिनी आणि फेरारीला मागे टाकेल असा दावा कंपनीने केला आहे. या वर्षअखेरी झेड ४ प्रथम युरोप आणि त्यानंतर भारतात सादर केली जाणार आहे.

ऑस्ट्रेलियातील ग्राजा माग्ना या प्रकल्पात ती तयार केली गेली असून या प्रकल्पात कंपनी अन्य चार कारही तयार करत आहे. बीएमडब्ल्यू आणि ग्राजा माग्ना मध्ये २००१ पासून भागीदारी करार झाला आहे. या प्रकल्पात तयार झालेली पहिली कार बीएमडब्ल्यू एक्स ३ ही असून ती २००३ च्या पॅरीस मोटार शो मध्ये सादर केली गेली होती.

झेड ४ ची बॉडी अतिशय मजबूत आहे पण तिचे सस्पेन्शनही अतिशय लाजबाब आहे. फस्त ड्रायविंग डायनामिक्स कन्सेप्ट वर तिची बांधणी केली गेली आहे. या कारला ३.० लिटरचे सहा सिलिंडर इंगीन दिले गेले आहे तसेच २.० लिटर ऑप्शन मध्येही ती उपलब्ध होणार आहे असे समजते.

Leave a Comment