परेश रावल साकारताहेत अजित दोभाल याची भूमिका


खासदार अभिनेते परेश रावल पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत दिसणार असल्याचे नुकतेच जाहीर झाल्यापाठोपाठ देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांचीही भूमिका ते साकारत असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरमधल्या उरी या भारतीय सैनिक छावणीवर हल्ला चढविला आणि १९ जवानांना ठार केले. त्यानंतर ११ दिवसातच भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील पाक तळांवर सर्जिकल स्ट्राईक करून या हल्ल्याचा बदला घेतला. या कथेवर उडी या नावाने चित्रपट बनविला जात आहे. त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनी फार महत्वाची भूमिका बजावली होती. तो रोल परेश रावल साकारत आहेत.

त्याच्याशिवाय या चित्रपटात राजी फेम विकी कौशल, यामी गौतम याच्या भूमिका असून चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करणार आहेत.