जिओचा डाऊनलोड स्पीड घटला


रिलायंस जिओ ४ जी चा डाऊनलोड स्पीड एप्रिल २०१८ मध्ये पुन्हा कमी झाला असून प्रतिस्पर्धी एअरटेल चा स्पीड थोडा वाढला असल्याचे ट्रायच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात जिओ चा स्पीड कमी झाला असून यंदाच्या वर्षात ३ वेळा हा स्पीड कमी झाला आहे.

अपलोड स्पीड मध्ये ६.५ एमबीपीएस स्पीड देऊन आयडिया नंबर वन वर आहे. त्याखालोखाल व्होडाफोन ५.२ एमबीपीएसच्या स्पीडने दोन नंबरवर, जिओ ४ एमबीपीएसच्या स्पीडने तीन नंबरवर तर एअरटेल ३.७ एमबीपीएस च्या वेगाने चार नंबरवर आहे. ट्रायने मायस्पीड अॅपच्या आकडेवारीचा उपयोग केला आहे त्यानुसार जीओचा ४ जीचा स्पीड एप्रिल महिन्यात ३३ टक्क्यांनी कमी झाला. डिसेंबर महिन्यात तो सर्वाधिक होता. ओपन सिग्नल रिपोर्ट नुसार जिओ ने ४ जी सेवा उपलब्ध करण्यात पहिला नंबर राखला असला तरी स्पीड बाबत एअरटेल जिओच्या पुढे आहे.

Leave a Comment