पेन्शन न मिळाल्याने विषारी नागोबासह पेन्शनर कार्यालयात दाखल


करण्ताकातील गदग जिल्यातील एका वृद्ध निवृतीवेतन धारकाला त्याची अडकलेली पेन्शन मिळविण्यासाठी चक्क कोब्रा नागाची मदत घ्यावी लागल्याचे समजते. गेले ८ महिने ६८ वर्षीय माबू साना नावाच्या या पेन्शनरला पोस्ट, बँकेत अनेक चकरा मारूनही पेन्शन मिळाली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार माबू यांनी पेन्शन ऑफिस, बँक, पोस्ट या ठिकाणी पेन्शन मिळावी यासाठी अनेक हेलपाटे घातले पण कुणीच त्याची दखल घेतली नाही. अखेरी वैतागलेल्या माबू यांनी अत्यंत विषारी समजला जाणारा कोब्रा हा नाग गळ्यात घातला आणि तहसीलदार कार्यालयात प्रवेश केला. पेन्शन द्या नाही तर कृतीला सामोरे जा असा दम त्यांनी भरला. कार्यालयातील कर्मचारयानी जिवंत नाग पाहून अगोदरच बाहेर पोबारा केला होता. मात्र तेथील एका अधिकाऱ्याने परिस्थिती धीराने हाताळली आणि ३-४ दिवसात पेन्शन देतो असे सांगून माबू यांना परत पाठविले.

माबू यांनी नंतर या नागोबना जवळच्या जंगलात सोडून दिले असे समजते.

Leave a Comment