जाणून घ्या सोव्हियेत संघाबद्दलची काही अविश्वसनीय तथ्ये.


रशियाचा इतिहास अतिशय रक्तरंजित आणि अनेक चढ-उतारांनी ग्रासलेला आहे. पहिल्या महायुद्धानंतर १९१७ साली रशियामध्ये उठाव झाला. त्यांनतर बोल्शेविक सत्ता रशियामध्ये स्थापन होऊन सोव्हियेत संघाची स्थापना झाली. १९८० सालापसून सोव्हीयेत संघाचे विघटन होऊ लागले, आणि अखेरीस ११९१ साली सोव्हियेत संघ संपूर्णपणे विघटीत झाला. सोव्हियेत संघाचा इतिहास जरी सर्वश्रुत असला, तरी त्याबद्दलची काही तथ्ये जनसामान्यांच्या तितकी परिचयाची नाहीत.

१८९७ सालापर्यंत सोव्हियेत संघातील एकूण जनसंख्येपैकी केवळ ३३% पुरुष आणि १४% महिला शिक्षित होत्या. १९२९ सालापर्यंत ही संख्या अनुक्रमे ६६.५% आणि ३७.२% झाली. मात्र १९८०-९० च्या काळामध्ये सोव्हियेत संघातील ९९.७% जनता शिक्षित झालेली होती. १९२९ साली सोव्हियेत संघाच्या सुप्रीम इकोनॉमिक काउन्सीलने असे कॅलेंडर तयार केले, ज्यामध्ये सुट्टीचे दिवस कमी आणि कामाचे दिवस जास्त होते. उद्देश हा, की कामगार सतत काम करीत राहिले, तर उत्पादन आपोआप वाढेल. पण ही योजना सपशेल फसली, कारण कामगार जरी सतत काम करीत असले, तरी कारखान्यांतील मशीने योग्य देखभालीच्या अभावी सतत बंद पडू लागली. उत्पादन सतत चालू ठेवायचे असल्याने मशीन्सच्या देखभालीसाठी पुरेसा वेळ उपलब्ध होत नव्हता.

१९२३ साली जन्मलेल्या पुरुषांपैकी २/३ संख्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये मरण पावली. १९२३ साली सोव्हियेत संघामध्ये जन्मलेल्या पुरुषांची संख्या ३.५ मिलियन इतकी होती. त्यापैकी १.६ मिलियन मुले बालपणातच काही आजाराने, दुष्काळाला बळी पडून मरण पावले. सुमारे ७००,००० युवक युद्धामध्ये कमी आले. त्यामुळे ३.४ मिलीयन पुरुषांपैकी, केवळ १.१ मिलियन पुरुष १९४६ सालापर्यंत जिवंत होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळी सोव्हियेत संघाच्या सैन्याने ऑस्श्वित्झच्या कॉन्सीन्ट्रेशन कँप मधून हजारो कैद्यांची मुक्तता करीत हिटलरच्या मुख्यालयावर कब्जा केला होता. हा दिवस २७ जानेवारी १९४५ चा होता.

मनुष्याला अंतराळामध्ये पाठविणारा सोव्हियेत संघ हा पहिला देश होता. त्यांच्या ‘व्होस्तोव प्रोग्राम’च्या अंतर्गत युरी गॅगरीन हा कॉस्मोनॉट पहिल्यांदा अंतराळात गेला. तसेच पहिले स्पेस स्टेशन अंतराळामध्ये पाठविणारा सोव्हियेत संघ हा पहिला देश होता. सोव्हियेत संघाचे विघटन होण्याआधी त्याचे अखेरचे नेते असलेले मिखाईल गोर्बाचेव्ह १९९७ साली प्रदर्शित करण्यात आलेल्या साठ सेकंदांच्या ‘पिझ्झा हट’ च्या जाहिरातीत दिसले होते. ह्या जाहिरातीमध्ये त्यांची नात देखील त्यांच्यासोबत दिसली होती. ह्या जाहिरातीतून मिळालेले उत्पन्न गोर्बाचेव्ह ह्यांनी समाजकल्याणाच्या कमी खर्च केले. तसेच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड ‘लुई व्हीतॉ’ साठीही गोर्बाचेव्ह ह्यांनी अॅड फिल्म केली होती.

Leave a Comment