आता सर्वसामान्य लोकही उडवू शकणार उडती कार


गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनी स्टार्टअप कंपनी किटी हॉक सह बनविल्या गेलेल्या उडत्या कारचे डीटेल्स जाहीर केले असून हि कार आता सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. फ्लायर नावाने तयार केलेल्या या १० छोट्या पंखांच्या कारच्या टेस्ट घेण्यासाठी बुकिंग सुरु झाले आहे.

सध्या या कारचे टेस्ट ड्राईव लास वेगास येथील सरोवरावर घेता येईल. हि कार उडविण्यास अत्यंत सोपी असून केवळ एक तासाचे प्रशिक्षण त्यासाठी पुरेसे आहे. हि कार चालवायला प्रोफेशनल पायलट परवाना गरजेचा नाही असे समजते. कुणीही १ तासाच्या प्रशिक्षणावर ती चालावू म्हणजे उडवू शकतो. सध्या या कारचा वेग ताशी ३२ किमी आहे तो लवकरच ८० किमीवर नेला जाणार आहे. सध्या ही कार ३२ किमी वेगाने जमिनीवरून १० फुट अंतरावरून उडवीता येत आहे. या कारला १० बॅटरी आहेत आणि एका चार्ज मध्ये ती २० मिनिटे उडू शकते.

Leave a Comment