शाओमी रेडमी वाय २ भारतात लाँच


चीनी कंपनी शाओमीने त्याच्या वाय १ चे अपग्रेड व्हर्जन रेडमी वाय २ दिल्लीत पेश केले असून या फोनची किंमत आहे ९९९९. या फोनची दोन व्हर्जन आहेत. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज साठी पहिली किंमत आहे तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसाठी १२९९९ रु. मोजावे लागणार आहेत. हे दोन्ही फोन अमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवर मिळणार आहे. आयए पॉवर्ड १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा, फेस अनलॉक, १८:९ रेशोचा डिस्प्ले हि त्याची वैशिष्टे आहेत. डार्क ग्रे, रोज गोल्ड आणि गोल्ड अश्या तीन रंगात तो उपलब्ध आहे.

फोनला ५.९९ इंची एचडी डिस्प्ले, ड्युअल सीम, रिअर व्हर्टिकल १२ एमपी आणि ५ एमपीचा ड्युअल कॅमेरा, अँड्राईड ओरिओवर आधारित मियू ९.५ ओ.एस, अशी अन्य फिचर आहेत. १२ जून पासून त्याची विक्री सुरु होत असून पहिल्या विक्रीत ग्राहकाने आयसीआयसीआय चे डेबिट अथवा क्रेडीट कार्ड वापरले तर ५०० रु. डिस्का मिळेल तसेच रेडमी वाय २ खरेदी करणाऱ्यास एअरटेल १८०० रु. कॅश डिस्काउंट व २४० जीबी मोफत डेटा देणार आहे.

Leave a Comment