या अब्जाधीश कन्यांना हवा आहे मिस्टर परफेक्ट


अंबानी घराण्यातील कन्या इशा हिला आनंद पिरामल जोडीदार म्हणून मिळाला आणि देशातील आणखी कोण कोण अब्जाधीश कन्या मिस्टर परफेक्टच्या शोधात आहेत याची चर्चा सुरु झाली. तेव्हा असे दिसले कि उद्योजक घराण्यातील बऱ्याच कन्या या यादीत आहेत. त्याच्या स्वप्नातला राजकुमार कधी येतो याची त्या प्रतीक्षा करत आहेत.

बिर्ला उद्योगाचे मालक कुमारमंगलम आणि नीरजा यांची कन्या अनन्या २३ वर्षाची असून तिने ऑक्सफर्ड मधून मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती यशस्वी बिझिनेस वूमन म्हणून ओळखली जाते.


बजाज एम्पायरची वारस कृशा बजाज फॅशन डिझायनर असून बॅग्ज व ब्रँडेड कपडे यामुळे नेहमीच चर्चेत असते.


एस्कॉर्ट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निखील नंदा यांची कन्या आणि बिग बी याची नात नव्या नवेली २१ वर्षांची आहे. मीडियात तिची नेहमीच चर्चा असते. न्यूयॉर्क विद्यापीठात ती शिकत असून आत्ताच ती सेलेब्रिटी आहे.


टोयाटो किर्लोस्करचे मालक विक्रम आणि गीतांजली यांची कन्या मानसी एकुलती एक आहे. मीडियापासून दूर राहणाऱ्या मानसीला फिरण्याची खूप आवड आहे.


जिंदाल एम्पायरचे मालक नवीन यांची १९ वर्षीय कन्या यशस्विनी उत्तम कुचीपुडी डान्सर असून तिचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

Leave a Comment