सलग १० व्या वर्षीही मुकेश अंबानींना पगारवाढ नाही


देशातील उद्योगजगतातील बडी कंपनी रिलायंस इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सलग १०व्या वर्षीही वार्षिक १५ कोटी रुपये वेतन घेतले आहे. अंबानींनी यंदाही पगारवाढ घेतलेली नसली तरी त्यांचे नातेवाईक निखील मेस्वनी आणि हितल मेसवानी आणि अन्य पूर्णवेळ संचालकांना घसघशीत पगारवाढ दिली गेली आहे.

कंपनीच्या २०१७-१८ च्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मुकेश यांनी २००८-०९ मध्ये घेतलेल्या पगार, अन्य भत्ते आणि कमिशन इतके म्हणजे १५ कोटीच असल्याचे जाहीर केले आहे. त्यापूर्वी त्याचे हे वेतन २४ कोटी होते. सीईओचे पगार ठराविक स्तरावर असावेत वा कसे यासंदर्भात वाद सुरु झाल्यापासून मुकेश यांनी स्वेच्छेने वेतन सीमा ठरवून घेतली असल्याचे सांगितले जात आहे. मुकेश याच्या वेतनात ४.४९ कोटी पगार भत्ता, ९.५३ कोटी कमिशन आणि अन्य सुविधा २७ लाख याचा समावेश आहे.

निखील आणि हितल मेसवानी यांचा पगार १६.८५ कोटींवरून यंदा १९.९९ कोटींवर पोहोचला असल्याचे आर्थिक अहवालात नमूद केले गेले आहे.

Leave a Comment